बेस्टमध्ये चोरी करणारा ताब्यात

गर्दीचा फायदा घेऊन बेस्टमधून प्रवास करणाऱ्या महिलांचे दागिने चोरणाऱ्याला समतानगर पोलिसांनी अटक केली. सुरेश पवार असे त्याचे नाव आहे. त्याच्याविरोधात दहाहून अधिक गुन्हे नोंद आहेत. पोलिसांनी त्याच्याकडून एक लाखाचे दागिने हस्तगत केले आहेत.