
सांताक्रुझ येथील घरातील बेकायदा बांधकाम सात दिवसांत तोडा अन्यथा पालिका हे बांधकाम स्वतः तोडेल, असा अल्टिमेटम पालिका प्रशासनाने भाजपचे नेते मोहित कंबोज यांना दिला आहे. याबाबत पालिकेने कंबोज यांना बुधवारी नोटीस बजावली आहे.
सांताक्रुझ पश्चिम येथील एसव्हीपी रोडवर खुशी प्राइड बेलमोंडो या तेरा मजली बिल्डिंगमध्ये मोहित कंबोज यांचे चार फ्लॅट आहेत. या फ्लॅटमध्ये बेकायदा बांधकाम झाल्याच्या तक्रारी पालिकेच्या एच/पश्चिम कार्यालयात करण्यात आली होती. यानुसार पालिकेने मोहित कंबोज यांना नोटीस बजावून 23 मार्च रोजी त्यांच्या घराची तपासणी केली असता घरात बेकायदा बांधकाम आढळले होते.

























































