
चर्चगेट येथील मस्तकी कोर्ट बिल्डिंग शेजारील फुटपाथवर शुक्रवारी रात्री उशिरा हत्येची घटना घडली. अज्ञात व्यक्तीने अन्य अनोळखी व्यक्तीची दगडाने डोके ठेचून हत्या केली. याप्रकरणी आझाद मैदान पोलीस अधिक तपास करत आहेत. चर्चगेटच्या नाशिक राव तिरपुडे मार्गावर शेअर मार्केट ब्रोकरचे काम करणारा हर्ष शहा (31) हा शुक्रवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास तिथे असताना त्याच्यासमोर अनोळखी व्यक्तीने 30 ते 35 वर्षीय तरुणाच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली. त्यानंतर आरोपी तेथून निघून गेला. हा प्रकार कळताच आझाद मैदान पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे. हत्येचे कारणदेखील समजू शकले नाही.