रुग्णसंख्येत पुन्हा वाढ, 1438 कोरोनाबाधित! 38 जणांचा मृत्यू, मुंबईत आकडा 35 हजार 273 वर

874

मुंबईत गेल्या काही दिवसांत सरासरी दीड हजाराने वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या सलग दोन दिवस एक हजाराच्या दरम्यान नोंदवली गेली. मात्र आज पुन्हा कोरोनाबाधितांचा आकडा वाढला असून एकाच दिवसांत 1438 रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे एकूण रुग्णांची संख्या 35 हजार 273 झाली आहे. तर 38 जणांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांचा आकडाही 1135 वर पोहोचला आहे.

मुंबईत मृत्यू झालेल्या 38 मृतांमध्ये 19 पुरुष आणि 13 महिलांचा समावेश आहे. मृतांमधील 24 जणांना दीर्घकालीन आजार होते. मृतांमधील 12 जणांचे वय 60 वर्षांहून जास्त, 17 रुग्णांचे वय 40 ते 60 वर्षे आणि 3 रुग्णांचे वय 40 वर्षांहून कमी होते. दरम्यान, मुंबईत गेल्या एकाच दिवसांत 763 जण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे एकूण कोरोनामुक्त होणार्‍यांची संख्या 9 हजार 817 वर पोहोचली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या