बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त

मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट-9 ने नवी मुंबईच्या उलवे येथील एका घरात सुरू असलेला बनावट नोटांचा कारखानाच उद्ध्वस्त केला आहे. 500 रुपयांच्या बनावट नोटा वितरित करणाऱया डॉन वर्की आणि विष्णू विजयनला पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या. यातील मुख्य सूत्रधारालादेखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याला लवकरच मुंबईत आणले जाणार आहे.

गुरुवारी अंधेरी येथे दोन जण बनावट नोटा घेऊन येणार असल्याची माहिती युनिट-9 चे अमित महांगडे यांना मिळाली. त्या माहितीची शहनिशा केली. पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक महेश देसाई यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक आशा कोरके, पोलीस निरीक्षक संजीव गावडे यांच्या पथकाने अंधेरीत सापळा रचला. पोलिसांनी सापळा रचून डॉन आणि विष्णूला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्या दोघांकडून पोलिसांनी 500 रुपयांच्या 590 अशा 2 लाख 95 हजार रुपयाच्या बनावट नोटा जप्त केल्या. बनावट नोटांप्रकरणी त्या दोघांविरोधात अंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. तपासादरम्यान एका फरार आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या