
मुंबई पोलिसांची ड्रग्जविरोधात धडक कारवाई सुरू आहे. गुजरातमधील फॅक्टरीवर कारवाई करत तब्बल 80 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आहे. अंधेरीतील साकीनाका पोलिसांनी ही कारवाई केली असून, पुढील तपास सुरू आहे. याप्रकरणी काही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली साकीनाका पोलिसांनी ड्रग्ज प्रकरणी गुजरातमध्ये ही कारवाई केली. जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जचा स्त्रोत, पुरवठा साखळी, ड्रग्ज रॅकेटचा शोध घेण्यासाठी साकीनाका पोलीस सखोल चौकशी करत आहेत. या कारवाईत मोठे खुलासे होण्याची आणि आणखी आरोपींना अटक होण्याची शक्यता आहे.




























































