मुंबई-पुण्यात कोरोना आणि ओमायक्रोनच्या सामूहिक संसर्गाला सुरुवात

राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिकसांमधील रुग्णवाढीचे आकडे पाहता मुंबई आणि पुण्यात कोरोना आणि ओमायक्रोन व्हेरिएंटच्या सामूहिक संसर्गाला सुरुवात झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

राज्यात बुधवारी ओमायक्रोनच्या 85 रुग्णांची नोंद झाली. सध्या नव्या कोरोना रुग्णांच्या चाचण्यांवेळी काही नमुने जिनोम सिक्केन्सिंगसाठी पाठवले जात आहेत. पुण्याच्या आयसर संस्थेने घेतलेल्या 38 नमुन्यांच्या चाचण्यांमधून मुंबई आणि पुण्यात ओमायक्रोन व्हेरिएंटचा समूह संसर्ग सुरू झाल्याचे प्राथमिक निदान करण्यात आल्याची माहिती राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी दिली.

ओमायक्रोनची बाधा झालेल्या अनेक रुग्णांनी आंतरराष्ट्रीय प्रकास केला नसल्याचे निदर्शनास आलेले नाही. त्यामुळे मुंबई आणि पुण्यात सामूहिक संसर्गाला सुरुवात झाल्याचा अंदाज बांधण्यात आला आहे. ओमायक्रोनच्या रुग्णांची संख्या वाढत असली तरी त्यांना जाणवणारी लक्षणे सौम्य आहेत. या रुग्णांना ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटरची गरज नसल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. ही चांगली गोष्ट असल्याचे डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले.

राज्याच्या कोरोना टास्क फोर्सचे सदस्य डॉ. राहुल पंडीत यांनीही महाराष्ट्रात ओमायक्रोनचा वेगाने प्रसार होत असल्याचे म्हटले आहे. कोरोनाचे नवे रुग्ण ओमायक्रोन व्हेरिएंटचेच आहेत का, याबाबत निश्चित माहिती नाही. पण गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णसंख्येत ज्याप्रकारे डबलिंग पाहायला मिळत आहे त्याकरून हा ओमायक्रोन व्हेरिएंट असावा. यापूर्वीच्या डेल्टा व्हेरिएंटमुळे कोरोना रुग्णांची संख्या इतक्या झपाटय़ाने वाढत नव्हती, असे त्यांनी म्हटले आहे.