मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर खासगी बसचा अपघात, चालकाचा जागीच मृत्यू, 10 प्रवासी जखमी

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर खासगी बसला भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये बस चालकाचा मृत्यू झाला असून 10 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईवरून कोल्हापूरला निघालेल्या खासगी बसला रायगडच्या खोपोली हद्दीत शनिवारी रात्रीच्या सुमारास अपघात झाला. पुणे लेनवर हा अपघात झाला असून यात बस चालकाचा जागीच मृत्यू झाला. 10 प्रवासी जखमी झाले असून त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातग्रस्त बस वैभव ट्रॅव्हल्स कंपनीची होती. अज्ञात वाहनाला मागून धडक दिल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.