का पडतोय मुंबईमध्ये मुसळधार पाऊस, वाचा सविस्तर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

मुंबई आणि उपनगारत शुक्रवारी म्हणजेच 26 जुलैला हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे जोरदार हजेरी लावली. दक्षिण मुंबईत ते पश्चिम उपनगरातील गोरेगाव, बोरिवली,विरार,पालघर तर दादरपासून कुर्ला,मुलुंड,ठाणे, नवी मुंबई ते कर्जत-कसाऱ्यापर्यंत जोरदार पाऊस झाला आहे. दिवसभर अधूनमधून धुवांधार कोसळत तर मधूनच संततधार पडत पावसाने वातावरण गारेगार करून टाकले. 29 जुलैपर्यंत पावसाचा मुक्काम लांबला असल्याचे हवामान खात्याने वर्तवलेल्या नव्या अंदाजामुळे स्पष्ट झाले आहे. 30 जुलैनंतर पाऊस दोन दिवस विश्रांती घेईल आणि त्यानंतर पुन्हा मुसळधार पावसाला सुरूवात होईल असा अंदाज आहे.

का कोसळतोय पाऊस?

बंगालच्या खाडीत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे अरबी समुद्रातील वाऱ्यांचा वेग वाढला असून मुंबई,कोकण,पुण्यात मुसळधार पाऊस पडत आहे. हवामान विभागाचे वरिष्ठ वैज्ञानिक ए.के.श्रीवास्तव यांनी ही माहिती दिली आहे.