राजावाडी रुग्णालयातील कोविड योद्ध्यांचा गौरव

घाटकोपर पूर्व येथील सेठ वाडीलाल छत्रभुज गांधी व मोनजी अमीदास व्होरा महानगरपालिका रुग्णालयाला आरोग्य समिती अध्यक्षा प्रवीणा मोरजकर यांनी भेट देऊन आरोग्य सुविधेचा आढावा घेतला. यावेळी रुग्णालयात काम करणार्‍या डॉक्टर्स, नर्स, आरोग्य कर्मचार्‍यांचा ‘कोविड योद्धा’ प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून पालिकेचे डॉक्टर्स, आरोग्य कर्मचार्‍यांसह संपूर्ण यंत्रणा अहोरात्र रुग्णांसाठी काम करीत आहे. या पार्श्वभूमीवर नवनियुक्त आरोग्य समिती अध्यक्षा प्रवीणा मोरजकर यांनी राजावाडी रुग्णालयाला भेट देऊन डॉक्टर्स, नर्स, आरोग्य कर्मचार्‍यांशी संवाद साधला. त्यांच्याकडून सुरू असलेल्या सेवेचा गौरव केला.

यावेळी आरोग्य समिती उपाध्यक्ष वसंत नकाशे, एन प्रभाग समिती अध्यक्षा स्नेहल मोरे, उपविभागप्रमुख चंद्रपाल चंदेलिया, प्रकाश वाणी आदी उपस्थित होते. यावेळी प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप जाधव, वैद्यकीय अधिक्षक डॉ. विद्या ठाकूर, महेंद्र खंदाडे आदींनी राजावाडी रुग्णालयातील वैद्यकीय सुविधेची माहिती मान्यवरांना दिली.

आपली प्रतिक्रिया द्या