मुंबईकरांच्या जिभेवर गुलाबजामचा गोडवा, झोमॅटोवर दिल्या सर्वाधिक ऑर्डर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गोड रसाळ गुलाबजाम खायला पुणाला आवडत नाही. पूर्ण भोजन झाल्यावर शेवटी गुलाबजामचा घास घ्यायचा आणि तृप्तीचा ढेकर द्यायचा, म्हणजे परमसुखाचा आनंदच जणू. सरत्या वर्षात हाच गुलाबजाम देशवासियांचे फेव्हरेट डेझर्ट ठरला आहे. झोमॅटो या फूड डिलिव्हरी सर्विस कंपनीने वार्षिक आकडेवारी नुकतीच जारी केली आहे. त्यानुसार गोड पदार्थांमध्ये गुलाबजामला सर्वाधिक मागणी दिसून आली आहे. दिवाळीच्या दिवसांत तर झोमॅटोवरून एक लाखापेक्षा जास्त ऑडर देण्यात आल्या. यामध्ये सर्वाधिक ऑडर्स या मुंबईतील होत्या.

बिर्याणी टॉपवर, मिनिटाला 22 ऑर्डर

काही दिवसांपूर्वी स्विगी कंपनीने दिलेल्या रिपोर्टनुसार लॉकडाऊनमध्ये हिंदुस्थानींनी बिर्याणी सर्वात जास्त फस्त केली होती. झोमॅटोच्या रिपोर्टमध्येही बिर्याणी टॉपवर आहे. दर मिनिटाला 22 बिर्याणीच्या ऑडर देण्यात आल्या आहेत. यामध्ये 19 लाख 88 हजार व्हेज बिर्याणी होत्या. त्याखालोखाल पिझ्झाचा नंबर लागला. झोमॅटोने मे महिन्यात 4.5 लाख, जुलै महिन्यात 9 लाख, सप्टेंबरमध्ये 12 लाख तर नोव्हेंबरमध्ये 17 लाख पिझ्झा डिलिव्हरी केली. जळगावच्या एका इसमाने 369 वेळा पिझ्झा ऑर्डर केला होता.