
येत्या 4 ऑक्टोबरपासून मुंबई महापालिका क्षेत्रातील शाळा सुरू करण्याच्या शिक्षण विभागाच्या प्रस्तावाला पालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे आता मुंबईतील सर्व माध्यमाचे, सर्व बोर्डाचे आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सोमवारपासून नियमित भरणार आहेत. राज्य सरकारने जारी केलेल्या कोरोना प्रतिबंधक मार्गदर्शक नियमांचे पालन करून शाळा उघडण्याच्या सूचना पालिका आयुक्तांनी शिक्षण विभागाला दिल्या आहेत. मात्र पालकांचे संमतीपत्र असेल तरच विद्यार्थ्याला शाळेत प्रवेश दिला जाणार आहे.
महापालिका क्षेत्रात येणाऱया शाळेत शिकविणाऱया 73 टक्के शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱयांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण पूर्ण झाले असून मंगळवारी 28 सप्टेंबर रोजी महापालिकेने राबविलेल्या विशेष कोरोना लसीकरण मोहिमेत मुंबई विभागातील 37 हजार शिक्षकांचे लसीकरण झाले आहे. शाळा सुरू होण्यापूर्वी सर्व शिक्षकांचे लसीकरण पूर्ण करणार असल्याचे मुंबई महापालिका शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी जाहीर केले आहे. तसेच महापालिका अधिपत्याखाली असलेल्या आठवी ते बाराकीच्या शाळा नजीकच्या पालिका आरोग्य केंद्र किंवा खासगी आरोग्य केंद्राशी जोडण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांना तीन खास मास्कचे वाटप केले जाणार आहे. यातील एकेक मास्क हा सलग 35 दिवस कापरता येणार आहे. तसेच शाळांचे सोडीयम हायपोक्लोराईड सोल्यूशनने निर्जुंतुकीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत तसेच एका बाकावर एक विद्यार्थी, विद्यार्थी, शिक्षकांचे टेम्परेचर मोजण्यासाठी थर्मामीटर, सॅनिटायजर्स वापराची सोय, वर्गातील पटसंख्या लक्षात घेता एक दिवसाआड शाळा अशा संकल्पनादेखील राबविण्यात येणार आहेत. पालिका शाळेच्या आवारात असलेले कोविड लसीकरण सेंटरही अन्यत्र हलविण्यात येणार असून अशैक्षणिक कामांवर नेमण्यात आलेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्याच्या सूचना शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी दिल्या आहेत.
शाळांच्या सॅनेटायझेशनची जबाबदारी पालिकेने घ्यावी
मुंबई महापालिकेने खासगी अनुदानित शाळांच्या सॅनेटायझेशनची जबाबदारीदेखील घ्यावी, अशी मागणी शिक्षक भारतीचे सुभाष मोरे यांनी केली आहे. शाळा सुरू करण्याच्या निर्णयाचे स्वागत आहे. पण एकाचवेळी शाळेत येणाऱया विद्यार्थ्यांचे ऑफलाईन शिक्षण आणि शाळेत न येणाऱया विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण कसे घ्यायचे याविषयीच्या सूचनादेखील शिक्षण विभागाने जारी कराव्यात, अशी मागणीदेखील मोरे यांनी केली आहे.
आठवी ते दहावीची विद्यार्थीसंख्या
महापालिका माध्यमिक शाळा 243
विद्यार्थी – 44,528
महापालिका प्राथमिक 538
शाळा (आठवीचा वर्ग असणाऱया)
विद्यार्थी 22833
इतर खासगी शाळा 1772
विद्यार्थीसंख्या 446141
प्राथमिक शाळांबाबत नोव्हेंबरमध्ये निर्णय
राज्य सरकारने जारी केल्याप्रमाणे सध्या 4 ऑक्टोबरपासून मुंबई महापालिका क्षेत्रातील आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात येणार आहे. प्राथमिक शाळांचे वर्ग कधीपासून सुरू करायचे याबाबत अद्याप काही ठरलेले नाही. मुंबईतील प्राथमिक शाळा कधीपासून सुरू करायचा याचा निर्णय नोव्हेंबरमध्ये दिवाळीच्या सुट्टीनंतर पालिका आयुक्त इक्बाल चहल यांच्याकडून घेतला जाण्याची शक्यता आहे. मात्र त्यावेळेची कोरोनाची परिस्थिती पाहूनच प्राथमिक शाळा सुरू करायच्या की नाहीत हे ठरविले जाणार आहे.
































































