
मुंबईच्या समुद्राला 4 डिसेंबरपासून 7 डिसेंबरपर्यंत सलग तीन दिवस मोठे उधाण येणार असून 4.5 मीटर ते 5.03 मीटरच्या लाटा उसळणार आहेत. त्यामुळे मुंबईकर आणि पर्यटकांनी समुद्रकिनारी जाणे टाळावे आणि पालिका-पोलिसांनी केलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून मोठय़ा भरतीचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये भरतीचा दिनांक व वेळ यासह भरतीदरम्यान समुद्रात उसळणाऱया लाटांची उंचीदेखील नमूद करण्यात आली आहे. 6 डिसेंबर रोजी मध्यरात्री 12 वाजून 39 मिनिटांनी 5.03 उंचीच्या लाटा उसळणार आहेत. त्यामुळे ‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी आणि छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे येणाऱया अनुयायांनीदेखील समुद्रकिनारी योग्य ती खबरदारी बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
अशा उसळणार लाटा
4 डिसेंबर – रात्री – 11-52 वा. – 4.96 मीटर
5 डिसेंबर सकाळी – 11-30 वा.- 4.14 मीटर
6 डिसेंबर – मध्यरात्री – 12-39 वा.- 5.03 मीटर
6 डिसेंबर – दुपारी – 12.20 वा. – 4.17 मीटर
7 डिसेंबर – मध्यरात्री – 01.27 वा. – 5.01 मीटर
7 डिसेंबर – दुपारी – 01.10 वा. – 4.15 मीटर



























































