
हत्येच्या आरोपाप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीची मुंबई सत्र न्यायालयाने निर्दोष सुटका केली आहे. पोलिसांकडे आरोपी विरोधात हत्येचा ठोस पुरावा नाही, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने फेब्रुवारी 2021 पासून तुरुंगात असलेल्या आरोपीची मुक्तता केली. शंकर मेश्राम असे त्या आरोपीचे नाव आहे. 31 जानेवारी रोजी तक्रारदाराचे वडील आनंद नांदोस्कर यांच्या जागेत दोन भाडेकरूंमध्ये भांडण झाले. सत्यपाल तिलगामे यांना मारहाण केल्याने जबर दुखापत झाली होती. यात त्यांचा मृत्यू झाला. शंकर मेश्राम यांनी मारहाण केल्याच्या आरोपावरून त्यांच्या विरोधात आरसीएफ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीच्या वतीने अॅड. रत्नदीप मेश्राम यांनी बाजू मांडली, तर पोलिसांच्या वतीने एस. ई. सोष्टे यांनी युक्तिवाद केला.