
सामना प्रतिनिधी। मुंबई
हिंदुस्थानमधील विविध बँका, पोस्ट ऑफिस, शेअर्स, इन्शुरन्समध्ये तब्बल 70 हजार कोटींची रक्कम बेवारस पडून आहे. या रकमेचा कोणीही वाली नाही. एक तर या रकमेच्या मालकाचा मृत्यू झालेला आहे किंवा त्यांनी केलेली गुंतवणूक विसरून गेले आहेत. ही रक्कम 2 हजार रुपयांपासून ते दोन लाखांपर्यंत आहे.
हिंदुस्थानमध्ये लोक विविध बँका, शेअर्स, म्युच्युअल फंड, इन्शुरन्समध्ये गुंतवणूक करत असतात. काही वेळा काही वर्षांनी गुंतवणूक करणाऱया व्यक्तीचा मृत्यू होता. काही जणांच्या वारसांना याची कल्पना नसते तर काही वेळा गुंतवणूकदाराला वारस नसल्यामुळे ही रक्कम तशीच पडून राहते. काही वेळा गुंतवणूक केल्यानंतर त्यात खंड पडतो आणि मग ती रक्कम काढायची राहून जाते. लोक नंतर ती विसरूनही जातात. अशा सगळय़ा छोटय़ा-मोठय़ा रकमेची ही 70 हजार कोटींची रक्कम बनली आहे.
शेसर्समध्ये लोकांचे 25 हजार कोटी रुपये पडून आहे. यातील गेल्या सात वर्षांत चार हजार कोटींचे शेअर्स आयईपीएफला हस्तांतरित करण्यात आले आहेत. विविध बँकांमध्ये 20 हजार कोटी पडून आहेत.




























































