
मुंबई पोलिसांनी गोरेगावमध्ये गुरुवारी हाय-प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये नंगानाच सुरु असताना पोलिसांनी येथे छापेमारी केली. यात पोलिसांनी एक अभिनेत्री आणि एका मॉडेलसह चौघांना अटक केली. सेक्स रॅकेटमध्ये अटक केलेल्या अभिनेत्री अमृता धनोआ (32) हिने एक्स बॉयफ्रेंड अरहान खान याच्यावर गंभीर आरोप केला आहे. अहरान यानेच आम्हाला फसवले आणि यात ढकलले असा आरोप अमृता हिने केला आहे. ‘आज तक‘ने याबाबत वृत्त दिले आहे.
पोलिसांनी अटक केल्यानंतर चौकशीदरम्यान अमृता हिने आपल्या एक्स बॉयफ्रेंडवर याचे खापर फोडले आहे. आम्हाला फसवण्यात आले आहे. ही छापेमारी एका मोठ्या कटाचा भाग असून हे सर्व अरहान याने केले आहे, असा आरोप अमृता हिने केला. अहरान हा ‘बिग बॉस -13’शोचा स्पर्धक आहे. स्पॉयबॉयने याबाबत वृत्त दिले आहे. तसेच पोलिसांचा काहीतरी गैरसमज झाला असून ते लोक एक छोटीशी पार्टी करत होते आणि हे त्यांनी समजून घ्यायला हवे, असेही रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, ज्या दोन अभिनेत्रींना अटक करण्यात आले आहे त्यांचा सेक्स रॅकेटमध्ये थेट सहभाग असल्याचे दिंडोशी पोलीस स्थानकाचे वरिष्ठ निरीक्षक धनेंद्र कांबळे यांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणी दोघांवर कलम 370 (3) आणि 34 अन्वये, तसेच मानव तस्करी विरोधी कायदा कलम 4 आणि 5 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

गुरुवारी रात्री नक्की काय घडलं?
पोलिसांना एका खबऱ्याने गोरेगाव येथील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये हाय-प्रोफाईल सेक्स रॅकेट सुरु असल्याची टीप दिली. यानंतर पोलिसांनी कारवाई करत येथे छापेमारी केली. पोलिसांनी ग्राहक बनून सेक्स रॅकेट चालवणाऱ्यांशी संपर्क साधला. सेक्स रॅकेटवाले आजूबाजूच्या हॉटेलमध्ये असणाऱ्या अमृता आणि ऋचासोबत संपर्कात होते. पोलिसांनी हॉटेलमध्ये छापेमारी करत दोघांना अटक केली. छापेमारीची माहिती मिळताच अमृताने फरार होण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी तिला अटक केली.































































