मुंबईत रंगणार ‘श्रावण महोत्सव 2021’, आंतरराष्ट्रीय डिजिटल पाककला स्पर्धेचे आयोजन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

श्रावण महिना सुरू झाला की, उत्सुकता लागते ती सणांच्या निमित्ताने होणाऱया नवनवीन चविष्ट पदार्थांविषयी. म्हणूनच श्रावण महिना आणि आपली खाद्य संस्कृती साजरी करण्यासाठी गेली पाच वर्षे सातत्याने प्रयत्न करणाऱया मिती क्रिएशन्सतर्फे यंदाही मुंबईत श्रावण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने यंदाही आंतरराष्ट्रीय डिजिटल पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मिती क्रिएशन्सच्या उत्तरा मोने यांनी दिली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा डिजिटल माध्यमांद्वारे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यंदाच्या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा विषय कोणत्याही प्रकारचे ज्यूस आणि मिश्र डाळींपासून तयार केलेला गोड किंवा तिखट असा एक पौष्टिक पदार्थ असा आहे. स्पर्धकांनी या दोन्ही रेसिपींचे साहित्य, कृती, आपलं नाव आणि ठिकाण यासहीत टाईप करून 9930115759 या क्रमांकावर व्हॉट्सअॅप करायचे आहे. स्पर्धकांनी रेसिपीसोबतच शेवटी आपल्या पदार्थाचं वैशिष्टय़ 4 ओळीत लिहावं. स्पर्धा स्त्राr व पुरुष सर्वांसाठी खुली असून स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कुठलंही शुल्क आकारलं जाणार नाही. रेसिपी पाठवण्यासाठी शेवटची तारीख 8 ऑगस्ट आहे.

या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे परीक्षण मान्यवर परीक्षकांचे एक पॅनल करणार असून अंतिम फेरीचे परीक्षण लंडन येथील इंडियन झिंगचे मनोज वसईकर, शार्लट, अमेरिका येथील ताईज किचनच्या संगीता कोरडे, दुबई येथील पेशवा रेस्टॉरंटचे सचिन जोशी, हिंदुस्थानातील पूर्णब्रह्मच्या जयंती कठाळे असे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे परीक्षक करणार आहेत.

स्पर्धेच्या विजेत्या स्पर्धकांना माधवबाग, माविम, एनकेजीएसबी बँक, निरगुडकर फार्म्स, द डेली बेकर्स यांच्यातर्फे आकर्षक भेटवस्तू दिल्या जातील. याचबरोबर विजेत्या स्पर्धकाला ईशा टूर्सकडून लडाखची मोफत टूर आणि कलामंदिर, ठाणे यांच्याकडून साडय़ांची महाराणी पैठणी देण्यात येणार आहे. स्पर्धेच्या प्रथम 3 विजेत्यांच्या रेसिपी प्रसिद्ध शेफ संजीव कपूर हे त्यांच्या यूटय़ूब चॅनलवर अपलोड करणार आहेत.