बनावट पासपोर्टवर कॅनडाला जाणाऱया तिघांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। मुंबई

बनावट पासपोर्टवर कॅनडाला जाण्याचा प्रयत्न करणाऱया तिघांना सहार पोलिसांनी अटक केली. हर्षकुमार धर्मेंद्रभाई पटेल, मितलाबेन महेशकुमार पटेल, हेमांगिनी अशोककुमार पटेल अशी त्या तिघांची नावे आहेत. त्या तिघांनाही न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

हेमांगिनी, हर्षकुमार आणि मितलाबेन हे तिघेही गुजरातचे रहिवासी आहेत. त्या तिघांनाही कॅनडाला जायचे होते. तेथे ते कायमचे स्थायिक होणार होते. त्याकरिता त्यांनी एका दलालाची मदत घेतली. दलालाच्या मदतीने बनावट पासपोर्ट तयार केले. कॅनडाला कुठे जायचे, तेथे गेल्यावर काय करायचे, याची अगोदरच माहिती त्या तिघांना देण्यात आली होती. शुक्रवारी ते तिघे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आले. तेव्हा मितलाबेनने हेमांगिनी आणि हर्षकुमार मुले असल्याचे भासवले. त्या तिघांच्या पासपोर्टची तपासणी केली. तेव्हा तो पासपोर्ट बनावट असल्याचे विमानतळ अधिकाऱयाच्या निदर्शनास आले. पुढील चौकशी करता त्या तिघांनाही सहार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. तिघांविरोधात सहार पोलिसांनी गुन्हा नोंद केला. कॅनडाला गेल्यावर ते दलालाला काही रक्कम देणार होते.