मुंबईचा युवा संघ निघणार इंग्लंड दौऱ्यावर, महिनाभराच्या दौऱ्यात पाच दोनदिवसीय आणि चार एकदिवसीय सामने खेळणार

मुंबईच्या 23 वर्षांखालील उदयोन्मुख क्रिकेटपटूंना इंग्लंडच्या क्षणाक्षणाला बदलणाऱया परिस्थितीचा-हवामानाचा अनुभव घेता यावा म्हणून मुंबई क्रिकेट संघटना आपल्या 18 खेळाडूंच्या संघाला इंग्लंडच्या महिनाभराच्या दौऱयावर पाठवत आहे. येत्या 28 जून ते 25 जुलैपर्यंत चालणाऱया या दौऱयात मुंबईचा युवा संघ पाच दोनदिवसीय आणि चार एकदिवसीय सामने इंग्लंडमधील विविध संघांशी मुकाबला करतील.

मुंबईच्या उदयोन्मुख संघाचे नेतृत्व धडाकेबाज फलंदाज सूर्यांश शेडगेकडे सोपवण्यात आले असून अंगक्रिश रघुवंशी, हिमांशु सिंह आणि मुशीर खानसारखे रणजीपटूंचाही संघात समावेश करण्यात आला आहे. या संघाच्या प्रशिक्षकाची जबाबदारी किरण पोवारवर सोपविण्यात आली आहे.

मुंबईचा संघ 28 जूनला लंडनला दाखल होईल आणि त्यानंतर नॉटिंगहमशायर, एसएसीए क्रिकेट क्लब, कम्बाईन नॅशनल काQटी, वर्सेस्टरशायर आणि ग्लुस्टरशायर या संघांविरुद्ध दोनदिवसीय सामने खेळेल. या लढतीनंतर चार एकदिवसीय सामनेही खेळणार असल्याची माहिती एमसीएने दिली.

मुंबई इमार्ंजग संघ ः सूर्यांश शेडगे (कर्णधार), वेदांत मुरकर (उपकर्णधार), अंगक्रिश रघुवंशी, आयुष वर्तक, आयुष झिमरे, हिमांशु सिंह, मनन भट्ट, मुशीर खान, निखिल गिरी, प्रज्ञेश कानपिल्लेवार, प्रतीककुमार यादव, प्रेम देवकर, प्रिन्स बदियानी, झैद पाटणकर, हृषिकेश गोरे, हर्ष आघाव, हर्षल जाधव.

मिलिंद नार्वेकर यांची क्रिकेटपटूंना लाखमोलाची मदत

मुंबई क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच एमसीएने आपल्या 23 वर्षाखालील 18 खेळाडूंना इंग्लंड दौऱयावर पाठवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या दौर्यावर निवडण्यात आलेल्या सर्वच्या सर्व 18 खेळाडूंना प्रत्येकी 100 पौंडाची (1.17 लाख रुपये) मदत करणार असल्याचे शिवसेना सचिव, आमदार आणि एमसीएचे अॅपेक्स काैन्सिल सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी जाहीर केले. त्यांच्या या लाखमोलाच्या मदतीचे उदयोन्मुख संघाने मनापासून आभार मानत त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली आहे.