दिव्यांगांना भुयारी मेट्रो प्रवासात 25 टक्के सवलत

भुयारी मेट्रो मार्गिकेवरून प्रवास करणाऱया दिव्यांग प्रवाशांसाठी सवलतीचे ट्रिप पास आता अँड्रॉइडवरही उपलब्ध होणार आहेत. मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशनने (एमएमआरसी) भुयारी मेट्रो मार्गिकेवर दिव्यांगांना तिकिट दरात 25 टक्के सवलत देण्याचा निर्णय रविवारपासून लागू केला. या सुविधेचा लाभ ’आयओएस’ व अँड्रॉइड अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवर घेता येणार आहे.

दिव्यांग प्रवाशांना एसटी महामंडळ आणि बेस्ट बसमध्ये तिकीट सवलत आहे. तसेच रेल्वेमध्ये 80 टक्के अपंगत्व असलेल्या दिव्यांग व्यक्तीला तिकीट दरात 75 टक्के व त्या व्यक्तीच्या मदतनीसाला 50 टक्के सवलत देण्यात येते. त्याच धर्तीवर मेट्रो प्रशासनाने अलिकडेच संपूर्णपणे प्रवासी सेवेत दाखल झालेल्या भुयारी मेट्रोच्या मार्गिकेवर दिव्यांग प्रवाशांना सवलत लागू केली आहे.

चेंबूरच्या माजी नगरसेविका नीलम डोळस यांची कन्या अर्चना हिचा विवाह प्रशांत हेगडे याच्याशी संपन्न झाला. या सोहळ्यास उपस्थित राहून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वधू-वरास शुभाशीर्वाद दिले. यावेळी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, विभागप्रमुख प्रमोद शिंदे, नीलेश भोसले, शेखर चव्हाण उपस्थित होते.