मुंबई विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्यासाठी यापुढे हिंदुस्थानी गणवेश

268
convocation

मुंबई विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्यात यापुढे हिंदुस्थानी गणवेश परिधान केला जाणार आहे. आतापर्यंत पदवीदान सोहळ्यात कुलगुरू आणि विद्यार्थी ब्रिटिश परंपरेप्रमाणे गणवेश परिधान करत होते. परंतु यापुढे विद्यार्थ्यांना हिंदुस्थानी गणवेशात पदवी स्वीकारता येणार आहे.

नुकत्याच झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत ही मागणी सर्वानुमते मान्य करण्यात आली. ‘मुक्ता’ शिक्षक संघटनेचे अध्यक्ष व सिनेट सदस्य प्रा. वैभव नरवडे यांनी पदवीदान सोहळ्यात हिंदुस्थानी पद्धतीचा गणवेश असावा अशी मागणी गेल्या वर्षी व्यवस्थापन परिषदेमध्ये केली होती. युवासेनेनेही त्या मागणीला पाठिंबा दिला होता. हिंदुस्थानी गणवेशाचे स्वरूप काय असावे याबाबत निर्णय घेण्यासाठी त्रिसदस्यीय समिती नेमण्याचे अधिकार कुलगुरूंना देण्यात आले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या