
वॅलेंनटाइन डे तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत ताज हॉटेलमध्ये अधिक रोमँटिक आणि मेमोरेबल बनवायचा असेल तर फक्त लिंकवर क्लिक करा आणि सात दिवस ताज हॉटेलात राहण्याचा मनमुराद आनंद लुटा. वाचून भुवया उंचावल्या असतील. पण सावधान, कारण ताज हॉटेलकडून अशी कोणतीही ऑफर देण्यात आलेली नसून सायबर भामटय़ांनी नागरिकांना फसविण्यासाठी ही नवी शक्कल लढवली आहे.
सायबर गुन्हेगारांकडून व्हॉट्सअॅपवर ताज हॉटेलच्या नावाने एक लिंक पाठविली जात आहे. ताज हॉटेलच्या वतीने वॅलेंनटाइन डेनिमित्त प्री कुपन अथवा प्री गिफ्ट कार्ड देण्यात येत असून त्या लिंकवर क्लिक करून ताज हॉटेलात सात दिवस राहण्याचा आनंद लुटा, अशी लालच दाखवली जात आहे. परंतु अशाप्रकारची कोणतीही ऑफर आम्ही ठेवलेली नसल्याचे ताज हॉटेलच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे कोणीही या प्री कुपन किंवा प्री गिफ्ट कार्डच्या मोहात अजिबात पडू नका. त्यामुळे अशा फसव्या लिंकपासून सावध राहा, असे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

























































