न्यायालयाने ‘झोमॅटो गर्ल’चा जामिन अर्ज फेटाळला

7594

सामना ऑनलाईन। मुंबई

काही दिवसांपूर्वी वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालून शिवीगाळ करणारी ‘झोमॅटो गर्ल’ प्रियंका मोगरे हीचा जामिन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. आपल्याला तीन वर्षांचा लहान मुलगा असून त्याला सांभाळणारे दुसरे कोणीही घरात नाही. यामुळे जामिन देण्यात यावा. अशी विनंती तिने न्यायालयाकडे केली होती. तसेच या काळात न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे वर्तन  करण्याचेही तिने न्यायालयाला सांगितले. पण न्यायालयाने तिचा जामिन अर्ज नामंजूर केला.

मात्र तिने केलेले कृत्य सामान्य नसून त्यासाठी सात वर्षाच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. जर तिला जामीन देण्यात आला तर ती गंभीर गुन्हा करू शकते असा युक्तीवाद सरकारी वकीलाने केला. त्यावर महिलेने केलेले कृत्य गंभीर आहे. त्यामुळे तिला जामिन देता येणार नाही असे न्यायालयाने स्पष्ट करत तिचा जामिन फेटाळला.

काही दिवसांपूर्वी नवी मुंबईतील वाशीमधील एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यात ‘ झोमॅटो साठी काम करणारी एक तरुणी पोलिसांना शिवीगाळ करताना दिसत होती. त्यानंतर हा व्हिडीओ मुंबई पोलिसांपर्यंत पोहोचला. तिच्यावर भादवि. कलम 353, 393, 294, 504, 506 अंतर्गत वाशी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तिला अटकही केली.

व्हायरल होणारा हा व्हिडीओ 8 ऑगस्ट रोजीचा आहे. तरुणीने तिची दुचाकी शिस्त मोडून उभी केली होती. यामुळे वाहतूक पोलिसांनी कारवाईसाठी दुचाकीचा फोटो काढला. त्यावरून तिने पोलिसांबरोबर हुज्जत घालून शिवीगाळ केली. पोलिसांना कारवाईपासून रोखले. याचा व्हिडीओ वाहतूक पोलिसांनी आपल्या मोबाईक कॅमेऱ्यात कैद केला आणि व्हायरल केला.

व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाल्यानंतर याची दखल मुंबई पोलिसांनी घेतली. वाहतूक पोलिसांनी याची रितसर तक्रार केल्यानंतर पोलिसांनी झोमॅटो कंपनीशी संपर्क साधून तिचे नाव, पत्ता घेतला आणि तिला अटक केली. सरकारी अधिकाऱ्यांवर हल्ला, लुटीच्या दृष्टीने अंगावर धावून जाणे, पोलीस हुकूम न मानणे, सरकारी कामात व्यत्यय आणणे या गुन्ह्यांची कलमं तिच्यावर लावण्यात आली आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या