चंद्रपुरात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे मुखवटे घालून मुंडन आंदोलन; सरकारविरोधात निषेध व्यक्त

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या दिवसापासून ओबीसी आंदोलनाकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात ओबीसी समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे. उपोषणकर्ते रवींद्र टोंगे यांची 11 व्या दिवशी प्रकृती खालावली आहे. टोंगेंच्या जिवाचे बरेवाईट झाल्यास संपूर्ण राज्यात उद्रेक होईल, असा इशारा राष्ट्रीय ओबीसी महासंघाने दिला आहे.

शहरात मुसळधार पाऊस सुरू असताना ओबीसी आंदोलनकांनी सरकारचा निषेध करत मुंडन आंदोलन केले आहे. आंदोलनस्थळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह ओबीसी मंत्र्यांचे मुखवटे घालून आंदोलकांनी मुंडन आंदोलन करत सरकारचा निषेध केला.