दिल्लीत अवघ्या 20 रुपयांसाठी व्यक्तीचा खून, दोघांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्लीत अवघ्या 20 रुपयांसाठी मुलाच्या समोरच वडिलांचा खून करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार रुपेश संत हा 38 वर्षीय व्यक्ती 24 सप्टेंबर रोजी आपल्य घराजवळ केस कापण्यासाठी गेला. तेव्हा. दुकानदाराने संतोषकडे 50 रुपये मागितले. तेव्हा संतोषने 30 रुपये दिले आणि 20 रुपये नंतर देऊ असे सांगितले. पण दुकानदाराने आताच्या आता 20 रुपये दे असे सांगितले. संतोष दुकानदाराला समजवत होता. पण दुकानदार ऐकण्याच्या तयारीतच नव्हता. तेव्हा दोघांमध्ये वाद झाला. दुकानदाराने संतोषला त्याच्या मुलासमोर लाठ्या काठ्याने मारहाण केली. त्यात संतोष गंभीर जखमी झाला. संतोषला रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.