
मैत्रीची नवी व्याख्या सांगणारा ‘मुसाफिरा’ हा चित्रपट येत्या काळात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या बिग बजेट मराठी चित्रपटाचे वैशिष्टय म्हणजे स्कॉटिश हायलँड्सच्या आयल ऑफ स्कायवर चित्रित केलेला हा पहिला हिंदुस्थानी चित्रपट ठरणार आहे.
आनंद पंडित मोशन पिक्चर्स आणि पुष्कर जोग यांच्या ‘व्हिक्टोरिया’ या भयपटाने प्रेक्षकांना सुंदर स्कॉटलँडची सफर घडवल्यानंतर हे दोघे आता पुन्हा ‘मुसाफिरा’ घेऊन येत आहे. त्याचे दिग्दर्शन पुष्कर जोग याने केले आहे. चित्रपटात पुष्कर जोग, पूजा सावंत, पुष्कराज चिरपुटकर, स्मृती सिन्हा, दिशा परदेशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
‘मुसाफिरा’बद्दल दिग्दर्शक पुष्कर जोग म्हणाला, अलीकडे मराठी चित्रपटांनी चित्रीकरणासाठी देशाची सीमा ओलांडली आहे. त्यामुळे आता मराठी चित्रपटाचे परदेशात चित्रीकरण करणे नवीन नाही. मात्र एक पाऊल पुढे टाकत ‘मुसाफिरा’ने मराठी सिनेसृष्टीत एक नवीन विक्रम प्रस्थपित केला आहे. निसर्गरम्य अशा स्कॉटिश हायलँड्सची सफर प्रेक्षकांची करमणूक द्विगुणित करेल हे नक्की. या वर्षाच्या अखेरीस ‘मुसाफिरा’ चित्रपटगृहात प्रदर्शित होईल.’’































































