मैत्रीचा ‘मुसाफिरा’ लवकरच

‘मुसाफिरा’… स्कॉटिश हायलँड्सच्या आयल ऑफ स्कायवर चित्रित झालेला पहिला हिंदुस्थानी चित्रपट. खरंतर चित्रपटाच्या घोषणेपासूनच ‘मुसाफिर’ची सर्वत्र चर्चा होती. एक म्हणजे चित्रीकरण स्थळ आणि दुसरे म्हणजे चित्रपटाची तगडी स्टारकास्ट. त्यामुळे हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार हे जाणून घेण्यासाठी अनेक जण उत्सुक होते. परंतु आता ही प्रतीक्षा संपली असून ‘मुसाफिरा’ च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. प्रेमाची नवीन परिभाषा सांगणारा हा चित्रपट येत्या 2 फेब्रुवारी रोजी  रोजी प्रदर्शित होणार आहे. या बिग बजेट चित्रपटात पुष्कर जोग, पूजा सावंत, पुष्कराज चिरपुटकर, भोजपुरी स्टार स्मृती सिन्हा, दिशा परदेशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

हृदयस्पर्शी कहाणी असेलला हा चित्रपट जुन्या मैत्रीची आठवण करून देणारा आहे. केवळ तरुणाईपुरता मर्यादित नसून प्रत्येक वयोगटासाठी आहे, असे पुष्कर जोगने सांगितले.