
केंद्र सरकारच्या एनआरसी आणि नागरिकत्व कायद्याच्या विरुद्ध संभाजीनगरमध्ये शुक्रवारी मुस्लीम समाजाच्यावतीने मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा आझाद चौकातून सुरू होऊन यामध्ये हजारो मुस्लीम सहभागी झाले होते. केंद्र सरकारने नागरिकत्वाचा सुधारित कायदा बनवला आहे. या कायद्याचा निषेध करण्यासाठी देशभरात सध्या आंदोलन सुरू आहे. त्याचे पडसाद राज्यात पडत असून संभाजीनगर जिल्ह्यातही आज मुस्लिम समाजाच्या वतीने आंदोलन केले आहे.


























































