मॉब लिंचिंगच्या धास्तीने राजस्थानमधील मुस्लीम करणार गोदान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। अलवर

राजस्थानमधील अलवर येथे काही दिवसांपूर्वी गोतस्करीच्या संशयावरून जमावाने रकबर खान या तरुणाला बेदम मारहाण करुन त्याची हत्या केली. या घटनेची धास्ती घेऊन येथील मुस्लीम नागरिकांनी यापुढे गायी न पाळण्याचा निर्णय घेतला असून असलेल्या गायी दान करण्याचा निर्णय घेतला आहे.

देशभरात सध्या मॉब लिंचिंगच्या घटनांमुळे वातावरण तापले आहे. याचदरम्यान अलवर येथे गोतस्करीच्या संशयावरून जमावाने रकबर खान या तरुणाची हत्या केली. याआधी अशाचप्रकारे गोतस्करीच्या संशयावरून पहलू खान याचीही हत्या करण्यात आली होती. यामुळे येथील मुस्लीमांमध्ये गायी पाळण्याबदद्ल धास्ती निर्माण झाली आहे. असलेल्या गायींचे दान करून म्हैस विकत घेण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. गाय पाळण्यापेक्षा म्हैस पाळणे अधिक सुरक्षित असल्याचे येथील मुस्लीमांनी सांगितले आहे.

तसेच काहीजणांनी आपल्या गोशाळेचेही दान करण्याची तयारी दर्शवली आहे.