मुस्लिमांची संख्या सीमेवर वाढली; गृहमंत्रालयाला दिला सावधानतेचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधीक

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थान-पाक सीमेवर राजस्थानात मुस्लिमांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. ही परिस्थिती चिंताजनक असल्याचे सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) म्हटले आहे. याबाबत तातडीने उपाययोजना कराव्यात असा सावधानतेचा इशारा  बीएसएफने केंद्रीय गृहमंत्रालयाला दिला आहे.बीएसएफने राजस्थानातील सीमावर्ती भागात केलेल्या महत्त्वपूर्ण सर्वेक्षणात धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

मुस्लिमांची कट्टरता वाढत आहे

‘बीएसएफ’ने आपल्या अहवालात महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदविले आहे. मुस्लिम समाजात धार्मिक कट्टरता वाढत आहे. हिंदू आणि मुस्लिमांमध्ये संवाद कमी होत आहे. सध्या सीमाभागात धार्मिक तेढ नसली तरी पुढील काळात तेढ निर्माण होऊ नये यासाठी खबरदारी घेणे आवश्यक असल्याचा सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

धक्कादायक स्थिती

  • जैसलमेरमधील मोहनगड, नयना, बहला, पोखरण, साम, तनोट या भागात बीएसएफने सर्व्हे केला.
  • सीमाभागात मुस्लिमांची लोकसंख्या तब्बल 20 ते 25 टक्क्यांनी वाढली आहे. इतर धर्मीयांची लोकसंख्या 8 ते 10 टक्क्यांनी वाढली आहे.
  • बीएसएफचे महासंचालक रजनीकांत मिश्रा यांनी अहवाल केंद्रीय गृहमंत्रालयाला दिला आहे. उपाययोजना कराव्यात, परिस्थिती चिंताजनक असल्याचे या अहवालात स्पष्टपणे म्हटले आहे.