ठरलं! 2021 ची आयपीएल स्पर्धा धोनी ‘या’ संघाकडून खेळणार

4190

टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याला बीसीसीआयने वार्षिक करारातून वगळले आहे. ऑक्टोबर 2019 ते सप्टेंबर 2020 दरम्यान हा करारा असणार आहे. गेल्या वेळेस ‘ग्रेड ए प्लस’मध्ये असणाऱ्या धोनीला चारही ग्रेडमध्ये (ग्रेड ए प्लस, ग्रेड ए, ग्रेड बी आणि ग्रेड सी) स्थान मिळालेले नाही. त्यामुळे त्याच्या निवृत्तीच्या चर्चा पुन्हा नव्याने सुरू झाल्या आहेत.

ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी टी-20 वर्ल्डकपमध्ये धोनी दिसणार की नाही याबाबतही चर्चा सुरू झाल्या. माजी खेळाडू मदन लाल यांनीही धोनी वर्ल्डकप खेळण्याची शक्यता फक्त एक टक्का आहे असे म्हटले होते. असे असले तरी धोनी यंदा होणारी आयपीएल स्पर्धा खेळणार असून या स्पर्धेत दमदार कामगिरी करून टी-20 वर्ल्डकपसाठी संघाचे दरवाजे पुन्हा उघडण्याची संधी त्याच्याकडे आहे.

धोनी आयपीएलमध्ये सुरुवातीपासून ‘चेन्नई सुपर किंग्ज’ या संघाचे नेवृत्व करतो. बीसीसीआयने करारातून वगळल्याने त्याच्या निवृत्तीच्या चर्चा सुरु असल्या तरी आयपीएलमध्ये धोनी 2020 च नाही तर 2021 मध्येही चेन्नईचे नेतृत्व करेन असे बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन श्रीनिवासह म्हणाले. 2021 मध्ये लिलावादरम्यान चेन्नईचा संघ धोनीला रिटेन करणार असल्याचे ते म्हणाले.

… म्हणून बीसीसीआयने धोनीचं नाव करारातून वगळलं

इंडिया सिमेंट्सचे उपाध्यक्ष श्रीनिवासन म्हणाले की, धोनी चेन्नईकडून खेळतच राहणार आहे. लोक म्हणतात की तो आता निवृत्ती घेईल… कधीपर्यंत क्रिकेट खेळत राहणार. परंतु मी तो चेन्नईकडून या वर्षी खेळणार असून पुढील वर्षी होणाऱ्या लिलावादरम्यान त्याला रिटेन करण्यात येईल हे आश्वासन देतो, असेही श्रीनिवासन यांनी स्पष्ट केले आहे.

महेंद्रसिंग धोनीचा पत्ता कट! ‘बीसीसीआय’ने वार्षिक करारातून वगळले

धोनीने टीम इंडियाला दोन विश्वचषक आणि आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद मिळवून दिले आहे. टीम इंडियाच्या या अनुभवी खेळाडूने 90 कसोटी, 350 एक दिवसीय आणि 98 टी-20 लढतींमध्ये हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व केले आहे. यात त्याने 17000 पेक्षा जास्त धावा काढल्या आहेत, तर यष्ट्यांमागे 829 शिकार केल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या