
सामना प्रतिनिधी। नगर
येथील सत्र न्यायालयाने अज्ञात मुलीचा पाठलाग केल्या प्रकरणी एका २१ वर्षीय तरुणाला दोषी ठरवत तीन वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली आहे. सुजर उर्फ अण्णा बबन माने ( 21, रा.काष्टी, ता.श्रीगोंदा) असे त्याचे नाव आहे.
पिडीत मुलगी तिचे आई वडीलांसोबत काष्टी येथे राहत होती. व ती रोज सकाळी 8 च्या सुमारास कॉलेजला पायी जात असे. परंतु जय भवानी चौक काष्टी येथे राहणारा सुजर रोज तिचा पाटलाग करायचा. .28 ऑक्टोबर 2015 रोजी सकाळी 7.30 वाजता नेहमी प्रमाणे पिडीत मुलगी घरातुन निघली असता आरोपीने तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. तसेच मुलीच्या घरच्यांना धमकी दिली की तुम्ही जर माझ्या घरी आला तर तुमचा जिव घेईल असा दम दिला. यावरुन पिडीतेच्या वडिलांनी फिर्याद दिली.
त्यानंतर सरकार पक्षातर्फे एकुण 4 साक्षीदार तपासण्यात आले. यात फिर्यादी व तिचे वडिल यांचे साक्ष महत्त्वाचे ठरली. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अॅड.पुष्पा के.कापसे-गायके यांनी काम पाहिजे. तसेच सदर खटल्यात पैरवी अधिकारी सहाय्यक फौजदार ठुबे यांनी सहकार्य केले.


































































