
नगर जिल्ह्यामध्ये शिवसेनेची ताकद आहे, नगर जिल्ह्यामध्ये आगामी काळामध्ये पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक प्रभागांमध्ये गावांमध्ये जाऊन शिवसेनेचा कार्याचा आढावा घ्यावा पक्षाची बांधणी आपल्याला अधिक बळकटीने करायचे असून यासाठी पदाधिकाऱ्यांनी कामाला लागा, नगर जिल्हा हा आपल्याला शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून त्याची ओळख निर्माण करायची आहे असे वक्तव्य शिवसेनेचे संपर्कप्रमुख आमदार सुनील शिंदे यांनी केले आहे.
आमदार शिंदे यांची संपर्कप्रमुख म्हणून निवड झाल्यानंतर त्यांचा आज नगर येथे शिवसेनेच्या वतीने येथील शासकीय विश्रामगृहामध्ये सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव, उपजिल्हाप्रमुख भगवान फुलसौंदर, उपजिल्हाप्रमुख रफिक शेख, युवा सेनेचे हर्षवर्धन कोतकर, रवी वाकळे, जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते.
आमदार शिंदे म्हणाले की, नगर जिल्हा आपल्याला माहिती आहे, जिल्ह्यामध्ये अनेक मातब्बर लोक आहे, आगामी काळामध्ये नगर जिल्ह्यामध्ये शिवसेनेची ताकद अधिक वाढवण्यासाठी आता पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक भागाचा दौरा करावा, कोठे आपल्याला शाखा करायचे आहे, कुठे संघटना बांधायची आहे किंवा त्या परिसरामध्ये काही कामे करायची आहेत तसेच जनतेमध्ये जाऊन त्यांचे काय प्रश्न आहेत ते घ्यावेत व आठ दिवसांमध्ये अहवाल आपल्याकडे द्यावा, आगामी काळामध्ये त्या अहवालावरून आपल्याला पक्ष संघटना बळकट करण्याच्या दृष्टिकोनातून पावले उचलायचे आहेत असे ते म्हणाले.
आगामी काळामध्ये नगर जिल्हा हा आपल्याला शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून त्याची ओळख होण्याच्या दृष्टिकोनातून काम करायचे आहे असे ते म्हणाले. शिवसेनेमध्ये आज अनेक पदे निर्माण झालेले आहेत त्या पदांचा आपण मानसन्मान आत ठेवलाच पाहिजे असेही ते म्हणाले.
शिवसेनेला संघर्ष हा नवा नाही, आता परिस्थिती संघर्षाची आहे पण आपल्याकडे शिवसैनिकाची ताकद ही मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्यामुळे आपल्याला पक्ष संघटना अधिक मजबूत करायची आहे, विधायक कामे आपल्याला शिवसेनेच्या मार्फत करून एक ताकद आपल्याला दाखवायची आहे, असेही आमदार शिंदे यांनी म्हटले आहे.
मी सुद्धा लहानपणापासून शिवसैनिक होतो आज मला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामुळे पद मिळाले सन्मान मिळाला याच पद्धतीने आपल्याला सुद्धा शिवसेनेमध्ये राहून सन्मान मिळाला पाहिजे शिवसेनेमध्ये कामाची पद्धत ही काही नवीन नाही पण दुसरीकडे आक्रमकपणा संयम शिस्त ही सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे, ती असेल तर निश्चितपणे आपल्याला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही असे ते म्हणाले.
नगर जिल्हा मला नव्याने नाही या जिल्ह्यामध्ये या अगोदर मी आलेलो आहे तसेच शिर्डी या ठिकाणी सुद्धा काम केलेले आहे पण नगरमध्ये शिवसेनेचे माजी उपनेते दिवंगत अनिल राठोड यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही तेही माझ्या जवळचे स्नेही होते असे आमदार शिंदे यांनी आवर्जून सांगितले.

































































