
राहाता परीसरात बिबट्याची मुक्त संचार सुरू असून 15 दिवसात सात शेळ्या व अनेक पाळीव व मोकाट कुत्र्यांचा फडशा पाडूनही अद्याप वनविभाग मात्र सुस्तच. राहाता परीसरातील पिंपळवाडी रोड, नपावाडी रोड, पंधराचारी तसेच एकुरखा शिव या परीसरात बिबट्याचे वास्तव्य दिसून येत असून पिंपळवाडी रोडला बोठे व बोरकर यांच्या दोन शेळ्या फस्त केल्या. वाघमारे यांच्या घरासमोर बांधलेले पाळीव कुत्र्याचे केवळ मुंडकेच साखळीला राहीले. पंधराचारी परीसरात लांडगे व लुटे यांच्या शेळ्या मारल्या. तसेच या परीसरात अनेकांनी बिबट्या पाहील्याने
नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
परीसरात पाळीव कुत्र्यांची संख्या झपाट्याने घटली आहे. तसेच बाहेर उघड्यावरील बांधलेल्या जनावरांची शेतकऱ्यांना धास्ती वाटत असून गेल्या पाच महिन्यापासून राहाता, एकुरखे व शिर्डी वन परीसरात या बिबट्यांची दहशत असताना वारंवार नागरीक वनविभाग अधिकाऱ्यांशी संपर्क करूनही कोनी याची दखल घेत नसल्याने नागरीकांमधे तिव्र संताप पसरला आहे. तसेच एखादे पाळीव जनावर बिबट्याने मारल्यावरही वनविभाग कर्मचारी वेळेवर पंचनामा करन्यासाठी वेळेवर येत नसल्याच्या नागरीकांच्या तक्रारी आहेत.
बुधवारी रात्री प्रभाकर लुटे यांच्या पंधराचारी येथील तारकंपाऊड च्या गोठ्याची जाळी तोडून एक बोकड व एक शेळी फस्त केली. याचा पंचनामा करन्यात आला असून यापूर्वी याच ठिकाणी दोन वेळा पिंजरे लावून दोन बिबटे पकडन्यात आले होते. वनविभागाने तातडीने या परीसरात पिंजरा लावून बिबट्या जेरबंद करावे अशी मागणी परिसरातील नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे.
































































