निवडणुका घ्यायला भाजप घाबरते; जयंत पाटलांची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्यायला भाजप तयार नाही. त्यामुळे ते घाबरले आहेत. कारण त्यांनी महाराष्ट्रात शिंदे गटाबरोबर जी युती केलेली आहे ती महाराष्ट्रातील जनतेला रुचलेली नाही. अशी स्पष्टोक्ती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली. नगर येथे सावता परिषदेचे पाचवे राज्यस्तरीय अधिवेशन पार पडले त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

ओबीसी समाजाची नव्याने जनगणना व्हावी अशी आमची मागणी आहे. समता परिषदेने सुद्धा जात निहाय जनगणना करावी अशी मागणी आहे ही मागणी योग्य असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

लोकसभा व विधानसभेच्या जागा महाविकास आघाडी म्हणून तर एकत्र लढलो तर निश्चितपणे जास्त जागा येतील असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. कांदा उत्पादकांचा प्रश्न हा अतिशय महत्त्वाचा आहे या संदर्भामध्ये विधानसभेमध्ये यावर चर्चा झालेली आहे. सरकारने यासंदर्भात थातुरमातुर उत्तर दिलेले आहे. विशेष म्हणजे एक समिती नेमली जाईल असे त्यांनी घोषणा केली ज्यावेळी समिती नेमतील तोपर्यंत हा विषय संपलेला असेल व शेतकऱ्यांना काहीच मिळायचे नाही निर्यात बंदीच्या संदर्भामध्ये त्यांनी त्यांची भूमिका जाहीर केली आहे असेही पाटील यांनी सांगितले कांद्याच्या प्रशासंदर्भामध्ये सरकार गांभीर्याने घेत नाही असे ते म्हणाले.