राज्‍य उत्‍पादन शुल्‍क विभागाची नववर्षा निमित्‍त धडक कारवाई

461

नाताळ व नूतन वर्षाच्‍या पार्श्‍वभूमीवर नेमलेल्‍या कोपरगाव विशेष पथकांनी दिनांक 26 डिसेंबर 2019 रोजी जेऊर कुंभारी व शिर्डी येथे अवैध मद्याची वाहन तपासणी करताना दारुबंदी गुन्‍हा अन्‍वेषण विभागाने दोन गुन्‍हे नोदविण्‍यात आले. यावेळी आरोपी  समाधान बाबासाहेब चव्‍हाण, विजय भास्‍कर, किरण दीपक जाधव यांना अटक करुन त्‍याच्‍याकडून देशी विदेशी मद्य एक टाटा कंपनीची इंडिका कार, 1 हिरो मेस्‍त्रो  दुचाकी वाहने मद्य वाहतूक करताना जप्‍त करण्‍यात आली आहे. या कारवाईत 1 लाख 60 हजार 264 किंमतीचा मुद्देमाल जप्‍त करण्‍यात आला. तसेच देशी दारु 121 लिटर, विदेशी दारु 32 लिटर जप्‍त करण्‍यात आली. मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 68 नुसार ही करावी करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या