नगर – प्रशांत गडाख यांना गौरव पुरस्कार जाहीर

406

महाराष्ट्र साहित्य कला प्रसारणी सभा, पुणे या नामांकित संस्थेद्वारे दिला जाणारा गौरव पुरस्कार या वर्षी यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांना जाहीर झाला आहे. प्रतिवर्षी स्व. अ‍ॅड. रावसाहेब शिंदे यांच्या स्मृतिदिनी दिला जाणारा हा पुरस्कार प्रशांत गडाख यांच्या ’गाव तिथे वाचनालय’ या अभियानासाठी त्यांना घोषित करण्यात आला आहे. प्रसारिणी सभेचे अध्यक्ष उध्दव कानडे व कार्याध्यक्ष सचिन ईटकर यांनी पुणे येथे या पुरस्काराची घोषणा केली.

महाराष्ट्रातील सामाजिक, शिक्षण, विज्ञान व साहित्य क्षेत्रात प्रशंसनीय कार्य करणार्‍या व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित केले जाते. पुरस्कार वितरण समारंभ शुक्रवारी (24 जानेवारी) सायंकाळी 5.45 वाजता पुणे येथील एस. एम. जोशी फाउंडेशनच्या सभागृहात होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या