
नगर अर्बन बँकेतील तब्बल 291 कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील संशयित आरोपी आणि बँकेचे निवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सतीश शिंगटे याचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. एच. शेख यांनी फेटाळला आहे.
सतीश शिंगटे आणि त्याच्या पत्नीच्या बँक खात्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात रोख रकमेच्या नोंदी आढळल्याचा गंभीर मुद्दा न्यायालयासमोर मांडण्यात आला आहे. सरकार पक्ष आणि फिर्यादींच्या बाजूने करण्यात आलेल्या युक्तिवादानंतर न्यायालयाने जामीन अर्ज नामंजूर केला आहे. शिंगटे यांच्याकडे पगाराशिवाय एवढी मोठी रोख रक्कम कोठून आली, याचे स्पष्टीकरण आरोपींच्या वकिलांना देता आले नाही. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे ऍड. मंगेश दिवाणे, तर फिर्यादी व ठेवीदारांतर्फे ज्येष्ठ अधिवक्ता ऍड. अच्युत पिंगळे यांनी हरकती नोंदवल्या. न्यायालयाने हे युक्तिवाद ग्राह्य धरून अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे.




























































