
सामना प्रतिनिधी । नगर
नगर अर्बन बँकेच्या अफरातफर प्रकरण चांगले गाजले होते. या प्रकरणी येथिल न्यायालयात दाखल याचिकेवर आज सुरवात होणार होती. मात्र, लेखापरीक्षक हजर न झाल्यामुळे याची सुनवणी दि.15 डिसेंबर रोजी ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
नगर अर्बन को ऑपरेटीव्ह बँकेत अनेक प्रकारचे मुद्दे सातत्याने गाजले आहेत. बँकेच्या कामकाजावर प्रश्नचिंन्ही निर्माण झाले आहे. त्यातच अफरातफरी प्रकरणी बँकेच्या आजी माजी संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आले होते. त्या संदर्भातील सुनावणी होणार होती.
आज भाजप खासदार दिलीप गांधी जिल्हा कोर्टात हजर झाले होते नगर अर्बन बँकेत अफरातफर झालेल्या 1 कोटी 75 लाखाचे अफरातफरीचे खटल्याची सुनावणी आज सुरू होणार होती. यावेळी वैधानिक लेखापरिक्षकाची साक्ष होणार होती, मात्र लेखापरीक्षक हजर न झाल्याने पुढील तारीख देण्यात आलीये. आता 15 डिसेंबर रोजी तारीख देण्यात आली. त्यामुळे आता 15 तारखे पासून या प्रकरणी सुनावणी सुरू होणार आहे
यावेळी न्यालायात राधावलब कासट, अशोक बोरा, मदन बाफना, राजेंद्र गांधी, दीपक गांधी, शैलेश मुनोत, बँकेच्या मुख्यकार्यकारी नवनीत गांधी, ऍड अभय आगरकर, आदींसह आजीमाजी संचालक उपस्थित होते.





























































