रोज होणाऱ्या टीकेमुळे एकनाथ शिंदे अस्वस्थ; अमोर मिटकरींनी साधला निशाणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेनेत फूट पाडण्यासाठीच भाजपाने ‘ऑपरेशन’ राबवले होते, असे वक्तव्य भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी केले होते. हे वक्तव्य त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोरट केले होते. महाजन यांच्या या विधानावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. गिरीश महाजन काही चुकीचे बोलले नाही. त्यांनी खरे सांगितले याबाबत त्यांचे अभिनंदन केले पाहिजे. त्यांच्या मनात जे होते, तेच बाहेर आले आहे. सहा महिन्यांपूर्वी भाजपनेच फोडाफोडीचे राजकारण केले, हे त्यांनीच आता जाहीरपणे सांगितले आहे. त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो, अशी प्रतिक्रियाही मिटकरी यांनी दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही दिवसांपासून अस्वस्थ आहेत. रोज कोणीतरी उठतो आणि त्यांच्या विरोधात बोलायला लागतो. विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी निवडणुका होत आहेत. त्यापैकी शिंदे गटाला एकही जागा मिळाली नाही, सर्व जागा भाजपाने घेतल्या. नुकत्याच नवनीत राणा अमरावतीत म्हणाल्या की आमच्या मनातले मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीसच आहेत. चंद्रकांत पाटीलही म्हणाले होते, की छातीवर दगड ठेऊन आम्ही एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केले. त्यामुळे शिंदे गटाचे भविष्य चांगले नाही, हे एकनाथ शिंदे यांनाही माहिती आहे, त्यामुळे ते अस्वस्थ आहेत, अशा शब्दांत मिटकरी यांनी शिंदे यांना टोला लगावला.

हसन मुश्रीफांविरोधातील ईडीच्या कारवाईवरूनही मिटकरी यांनी सोमय्यांवर टीकास्र सोडले. मुश्रीफांवर ईडी कारवाई करणार हे सोमय्यांना कसं माहिती होतं, सोमय्या ब्रम्हज्ञानी आहेत का, काही दिवसांपूर्वी सोमय्यांनी भावना गवळी, यशवंत जाधव यांच्याविरोधातही रान उठवले होते. ते शिंदे गटात गेल्या-गेल्या तुम्ही शांत का झालात असा सवालही त्यांनी केला. हसन मुश्रीफ यांना विकत घेण्याचा प्रयत्न भाजपाने केला होता. मात्र ते विकले गेले नाही, त्यामुळे ही कारवाई करण्यात आली, असा आरोपही मिटकरी यांनी केला.