अटकेच्या भीतीने चोर दाम्पत्यांने विषारी लाडू खाल्ले, ट्रेनमध्ये केली आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक

सामना ऑनलाईन । नागपूर

लोकांना अडीच कोटी रुपयांचा चुना लावत 12 किलो सोने लंपास करून वाराणसीला पळून जाणाऱ्या चोर दाम्पत्याने अटकेच्या भीतीने धावत्या ट्रेनमध्ये विष प्राशन करून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. हे दाम्पत्य एर्नाकुलम-पाटणा एक्सप्रेसमधील एस 5 कोचमधून प्रवास करत होते. राजकुमार अरुमुगम ( 46) आणि शिवसेल्वी (38) अशी त्यांची नावे आहेत. हे दाम्पत्य मूळचे तामिळनाडूचे आहे.

तामिळनाडू मधील सुभाष पिल्लई यांनी १९ ऑगस्ट रोजी कन्याकुमारी जिल्ह्यातील अंजुगरामम पोलीस ठाण्यात राजकुमार व त्याची पत्नी शिवसेल्वी यांनी आपली व इतर चारजणांची फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली होती. याची कूणकूण लागल्याने या दाम्पत्याने पळून जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी वाराणसीचे तिकीट काढले. यासाठी एर्नाकुलम-पाटणा एक्सप्रेस त्यांनी पकडली. यादरम्यान तामिळनाडू पोलिसांनी हे चोर दाम्पत्य अडीच कोटींची रोकड व १२ किलो सोने घेऊन पळाल्याची माहिती रेल्वे पोलिसांना दिली होती. यामुळे आरपीफ पोलीस या दाम्पत्याच्या शोधात होते. सकाळी ८.०५ मिनिटांनी ट्रेन नागपूर स्थानकात पोहोचताच पोलीस ट्रेनमध्ये घुसले. हे बघताच दाम्पत्य हादरले. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या सामानाची झाडाझडती घेतली. पण त्यांना काहीच सापडले नाही. नंतर पोलिसांनी त्यांना आपल्यासोबत यावे लागेल असे सांगितले. यामुळे राजकुमार व शिवसेल्वी आणखीनच घाबरले.

पोलीस आपल्याला आता अटक करणार याची त्यांना भीती वाटली. पण त्यानंतर काहीवेळाने दोघेही बेशु्द्ध पडले. पोलीस ट्रेनमध्ये आल्याचे कळताच त्या दोघांनी लाडू खाल्ल्याचे इतर प्रवाशांनी पोलिसांना सांगितले. यामुळे पोलिसांनी दाम्पत्याला नरखेड येथील रुग्णालयात दाखल केले. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. विष कालवलेले लाडू खाल्ल्यानेच त्यांच्या मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

summary…nagpur-couple commited suicide in train