एक कोटी रुपये न दिल्यास खासगी फोटो व्हायरल करेन, अग्निशमन अधिकाऱ्याला धमकावणाऱ्या नातेवाईकाला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नागपूर महानगरपालिकेच्या मुख्य अग्निशमन अधिकाऱ्याला (CFO) ब्लॅकमेल केल्याप्रकरणी नागपूर पोलिसांनी एका 27 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार आरोपी अधिकाऱ्याला एक कोटी रुपये न दिल्यास खाजगी छायाचित्रे आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत ​​होता. आरोपी अमित सोनी हा छत्तीसगडमधील राजनांदगावचा रहिवासी आहे. या प्रकरणात त्याच्या पत्नीलाही सहआरोपी करण्यात आले आहे. आरोपी हा पीडित अधिकाऱ्याचा नातेवाईक आहे.

अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार आरोपी सोनी याने माझ्याशी संपर्क साधला होता. त्याने सांगितले की त्याच्याकडे माझे आक्षेपार्ह फोटो आहेत. जे मी आरोपीच्या पत्नीला पाठवले होते. ते फोटो माझ्या सीएफओच्या कुटुंबातील सदस्य आणि मित्रांसोबत शेअर केले जाऊ नयेत. यासाठी त्याने एक कोटी रुपयांची मागणी केली.

काही दिवसांनी वाटाघाटीनंतर आरोपी सोनी याने 70 लाख रुपयांवर तडजोड केली आणि पीडित व्यक्ती कडून पहिला हप्ता म्हणून 28 लाख रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. आरोपीच्या सततच्या छळाला कंटाळून पीडित व्यक्तीने गुन्हे शाखेकडे धाव घेतली. याची दाखल घेत पोलिसांनी सापळा रचला आणि नागपुरातील सदर भागातील एका रेस्टॉरंटमध्ये पीडित व्यक्तीकडून पैसे घेताना शुक्रवारी आरोपीला पोलिसांनी पकडले. खंडणीच्या आरोपावरून सोनी आणि त्याच्या पत्नीविरुद्ध सदर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले.