
नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पात प्लॉट ए येथील 14 चाळीतील रहिवाशांची पुनर्विकाससंदर्भातील बैठक म्हाडाच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत रहिवाशांनी पुनर्विकासाबाबत शासनाच्या भूमिकेसंदर्भातील अनेक प्रश्न उपस्थित केले. रहिवाशांच्या समस्या ऐकून त्यांचे योग्य निरसन करण्याच्या सूचना शिवसेना सचिव-खासदार अनिल देसाई यांनी म्हाडाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. जेणेकरून हा प्रकल्प गतिमान होईल आणि रहिवाशांना वेळेत त्यांच्या हक्काची घरे मिळतील. तसेच रहिवाशांना पुनर्विकासासंदर्भात काही प्रश्न असतील तर मी स्वतः लक्ष घालून आपले प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य देईल, असे आश्वासन खासदार अनिल देसाई यांनी दिले.
म्हाडाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीला म्हाडाचे एक्झिक्युटिव्ह इंजिनीअर भडांगे, जोजन त्याचप्रमाणे एल अॅण्ड टीचे प्रोजेक्ट मॅनेजर नरेश महाजन यांच्यासह माजी महापौर श्रद्धा जाधव, माजी नगरसेविका उर्मिला पांचाळ, स्थानीय लोकाधिकार समितीचे सरचिटणीस दिनेश बोभाटे, विभाग संघटक राकेश देशमुख, शाखाप्रमुख अभिषेक सावंत, उपविभाग समन्वयक प्रशांत घाडीगावकर, शाखा संघटक वंदना मोरे, दत्ता दिवेकर, राजेंद्र सोनवणे, अॅड. मनोज टपाल, पालमहेंद्र मुनगेकर, आनंद धनावडे, सुनील जाधव, संदीप चव्हाण, सचिन पाटणकर, जीवक वावळ, राजेंद्र सोनवणे, प्रदीप कदम, नंदन खोपकर, महादेव पाटील, प्रकाश कदम, अनिकेत सकपाळ, जयवंत गुजर, विजयकांत वंजारे यांच्यासह स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.