
नाईक मराठा मंडळ मुंबई यंदा शंभराव्या वर्षात पदार्पण केल्याच्या पार्श्वमूमीवर संस्थेचा शतक महोत्सव पदार्पण सोहळा कुडाळ येथे नुकताच पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन कवी आणि सांस्कृतिक कार्यकर्ते अजय कांडर यांच्या हस्ते झाले. यावेळी मधुकर नारायण उर्फ बाबा आचरेकर स्मृती समाज गौरव पुरस्कार डॉ. प्रमोद वालावलकर यांना मरणोत्तर प्रदान करण्यात आला. यावेळी मंडळाचे कार्याध्यक्ष सुनील सांगेलकर, चिटणीस किरण नाईक, सिंधुदुर्ग देवळी हितवर्धक समाजचे जिल्हाध्यक्ष राजन नाईक, प्रज्ञा वालावलकर उपस्थित होते. या कार्यक्रमात मंडळाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.




















































