नांदेड – कोरोना बाधितांचा आकडा 17,420 वर, आज 120 रूग्णांची नोंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना विषाणू संसर्गामुळे आज चार जणांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात आजपर्यंत मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या ४५६ एवढी झाली आहे. आज १२० जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले असून, जिल्ह्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या १७४२० एवढी झाली आहे.

आज तरोडा नांदेड येथील ५३ वर्षीय महिाल, धानोरा ता. कंधार येथील ७१ वर्षीय पुरुष, आजमपूर ता.बिलोली येथील ५५ वर्षीय पुरुष आणि मुदखेड येथील ७१ वर्षीय पुरुष अशा चार जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज ८७७ रुग्णांच्या स्वॅबचे अहवाल तपासण्यात आले. त्यात ७१० जणांचे रिपोट निगेटीव्ह आले आहेत तर आज १२० रुग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह आढळले असून त्यामुळे एवूâण रुग्णसंख्या १७४२० वर पोहोचली आहे.

आज नांदेड महापालिका क्षेत्रात ४४, अर्धापूर २, किनवट १०, नायगाव ५, कंधार २, नांदेड ग्रामीण १०, हदगाव १, देगलूर ४, उमरी १, परभणी २, यवतमाळ २, हिंगोली ६, लोहा २, माहूर ४, भोकर ३, मुखेड ३, मुदखेड ६, बिलोली १२ अशा १२० रुग्णांचा अहवाल पॉझीटीव्ह आला आहे.

आज २०५ कोरोनाबाधीत रुग्णांवर उपचार करुन त्यांना बरे वाटू लागल्याने सुट्टी देण्यात आली. त्यामुळे उपचार घेवून घरी परतलेल्या रुग्णांची संख्या १४३९७ एवढी झाली आहे. आता वेगवेगळ्या कोविड केअर सेंटर आणि खासगी रुग्णालयात मिळून २४६१ रुग्ण उपचार घेत असून, त्यापैकी ४८ जणांची प्रकृती गंभीर आहे.