नांदेड जिल्ह्यात आज 170 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह, एकही मृत्यूची नोंद नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना विषाणू संसर्गामुळे आज एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसून, मृत रुग्णांची संख्या ४४८ वर स्थिर आहे. आज १७० जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले असून, जिल्ह्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या १७१७० एवढी झाली आहे.

आज १३५२ रुग्णांच्या स्वॅबचे अहवाल तपासण्यात आले. त्यात ११७१ जणांचे रिपोट निगेटीव्ह आले आहेत तर आज १७० रुग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह आढळले असून त्यामुळे ऐकूण रुग्णसंख्या १७१७० वर पोहोचली आहे.

आज नांदेड महापालिका क्षेत्रात १०१, हिमायतनगर १, बिलोली ३, कंधार ३, नांदेड ग्रामीण ११, हदगाव १, मुखेड १८, हिंगोली २, किनवट १२, धर्माबाद १, परभणी ३, यवतमाळ १, लोहा ३, माहूर ८, भोकर १, उमरी १, अर्धापूर ४ असे पॉझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत.

आज २२२ कोरोनाबाधीत रुग्णांवर उपचार करुन त्यांना बरे वाटू लागल्याने सुट्टी देण्यात आली. त्यामुळे उपचार घेवून घरी परतलेल्या रुग्णांची संख्या १३९०९ एवढी झाली आहे. आता वेगवेगळ्या कोविड केअर सेंटर आणि खासगी रुग्णालयात मिळून २७१० रुग्ण उपचार घेत असून, त्यापैकी ६३ जणांची प्रकृती गंभीर आहे.