भूतानचे वैज्ञानिक उपग्रह बनवतील, मोदींना विश्वास

549

उपग्रह बनवले की, त्याद्वारे टेली मेडिसिनचे फायदे मिळतात, दूरदूरपर्यंत शिक्षण पोहोचविता येते, हवामानाचे पूर्वानुमान करता येते तसेच नैसर्गिक आपत्तींपासून संरक्षण करता येते. आमच्या वैज्ञानिकांप्रमाणेच भूतानचे वैज्ञानिकही उपग्रह बनवतील, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे व्यक्त केला. आपल्या दोन दिवसांच्या भूतान भेटीवरील दुसऱया दिवशी रॉयल युनिव्हर्सिटीत ते बोलत होते.

मोदी पुढे म्हणाले की, आपल्या छोटय़ा उपग्रहाचे डिझाईन करण्यासाठी आणि हा उपग्रह लाँच करण्यासाठी तरुण भूतानी वैज्ञानिक हिंदुस्थानमध्ये येणार आहेत ही आनंदाची बाब आहे. एक दिवस असाही येईल जेव्हा तुमच्यातील अनेक वैज्ञानिक, इंजिनीयर्स आणि इनोव्हेटर्स होतील ही मला खात्री आहे. भूतानी वैज्ञानिक लवकरच उपग्रह बनवतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या