मोदींच्या सभेच्या मंडपाचा भाग कोसळला , 4 मजूर जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रसाद नायगावकर

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यवतमाळ येथे येणाऱ्या २८ तारखेला येणार आहेत . सध्या या कार्यक्रमाची प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरु आहे . त्याच्यातच यांच्या कार्यक्रमासाठी यवतमाळ शहराजवळ भारी येथे प्रशस्त असा मंडप उभारणे चालू आहे . उभारण्यात येणारा सभामंडपाचा पिलर कोसळला आहे. यात 4 कामगार जखमी झाले आहेत.

भारी गावात 50 एकर जागेवर हा मंडप उभारण्यात येत आहे.त्यातील एक डोम उभा करण्याचे काम सुरू असताना त्याचा पिलर जमिनीवर निखळला. त्यामुळे त्याचे खांब खाली येऊन क्रेन वर कोसळले. त्यामुळे त्याखाली असलेले कामगार मात्र सुदैवाने बचावले. दरम्यान जखमी मजुरांना उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शिवाय वरिष्ठ पोलीस अधिकारी व बांधकाम विभागाचे अभियंता घटनास्थळी पोहोचले . या चार मजुरांना शासकीय रुग्णालयात भरती केले असून यांची प्रकृती स्थिर आहे . या घटनेच्या संदर्भात कोणतेही पोलीस अधिकारी बोलण्यास तयार नाही . मंडप उभारणीचे काम हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेख मध्ये होत आहे . या घटनेच्या संदर्भात बांधकाम विभाग हे प्रेस नोट काढणार असल्याचे सांगितले जाते . पण वृत्त लिहिस्तोवर ही प्रेस नोट मिळाली नाही . त्यामुळे तिथे नेमका हा अपघात कसा झाला हे अद्याप स्पष्ट झाले नाही .