
विधानसभा उपाध्यक्ष, दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ यांच्या मुलाचा विवाह सोहळा मंगळवारी करंजाळी येथे मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत साधेपणाने झाला. ‘फेसबुक लाईव्ह’द्वारे या सोहळ्याचे क्षण अनुभवत हजारो वऱ्हाडींनी वधु-वरांना शुभाशीर्वाद दिले.
दिंडोरी तालुक्यातील वनारे येथील नरहरी झिरवाळ यांचे पुत्र गोकुळ आणि पेठ तालुक्यातील करंजाळी येथील जयमाला पद्माकर गवळी यांचा विवाह करंजाळी येथे मंगळवारी दुपारी झाला. यावेळी दोन्ही कुटुंबातील सदस्य आणि मोजके नातेवाईक उपस्थित होते. आमदार हिरामण खोसकर आणि भास्कर गावीत यांनी हजर राहून आशीर्वाद दिले. नरहरी झिरवाळ यांच्या फेसबुक पेजवर या विवाह सोहळ्याचे लाईव्ह करण्यात आले होते. हजारो मित्रमंडळी, नातेवाईक यांनी विवाह सोहळ्याला ऑनलाईन हजेरी लावली.





























































