तुझ्या बापाला तुरुंगात घालणारच, प्रणिती शिंदेंना माजी आमदाराचे ओपन चॅलेंज

34572

विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची तारीख जशी जवळ येत आहे तसे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापताना दिसत आहे. प्रचारसभांमधून एकमेकांवर आरोपप्रत्यारोप आणि चिखलफेक सुरू झाली आहे. याच दरम्यान ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते आणि माजी आमदार नरसय्या आडम अर्थात आडम मास्तर यांचा आज प्रचार सभेत तोल सुटला. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार आणि काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांना ओपन चॅलेंज दिले आहे.

‘थकलेल्या’ काँग्रेस-राष्ट्रवादीचं विलिनीकरण? सुशीलकुमार शिंदेंचं सूचक विधान

नरसय्या आडम यांनी ‘तुझ्या बापाला तुरुंगात घातल्याशीवाय स्वस्थ बसणार नाही’ असे प्रणिती शिंदेंना सुनावले. सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून प्रणिती शिंदे यांच्या विरोधात आडम मास्तर उभे आहेत. अनेक दशकं विधानसभेत गाजवल्यानंतर आडम मास्तर आता पुन्हा निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात 3239 उमेदवार, वाचा कोणत्या जिल्ह्यात किती उमेदवार

प्रचारसभेत बोलताना नरसय्या आडम म्हणाले, ‘तुझ्या बापाला तुरुंगात घातल्याशिवाय आडम मास्तर शांत बसणार नाही. जो पंतप्रधानाला सोलापुरात आणू शकतो तो कोणालाही जेलमध्ये घालू शकतो. माझ्यावर 170 केसेस आहेत त्या 200 झाल्याशिवाय गप्प बसणार नाही. हे गुन्हे म्हणजे माझ्यासाठी अलंकार आहेत असेही ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या